23.5 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriवन्यप्राणी हल्ल्यातील बाधितांना ९८ लाख…

वन्यप्राणी हल्ल्यातील बाधितांना ९८ लाख…

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांत १९ जणांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याचे प्रकार घडले होते. त्यात ४ जणांचा मृत्यू, तर १४ जण गंभीर जखमी आणि १ किरकोळ जखमी झाला. त्यातील मृतांच्या नातेवाइकांना तसेच जखमींना आतापर्यंत ९८ लाख १५ हजार ४४५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, गवा, रानडुक्कर, अस्वल, माकड या वन्यप्राण्यांच्या व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले. यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, रानगवा, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात सह्याद्री खोऱ्याच्य पायथ्याला असलेल्या गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली कायम दिसून येतात. विशेषतः बिबट्या, रानडुक्कर, रानगवा, माकड या प्राण्यांचा संचार अधिक वाढला आहे. यामध्ये एखाद्यावेळी मानवी हस्तक्षेप घडल्यास त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याचे प्रकार घडतात.

बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ कोंबडी, कुत्री खाण्याच्या उद्देशाने होत असल्याने त्यातून काहींवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये २०२२-२३ मध्ये सतीश शांताराम जाधव (फुरूस), भिकाजी राघू माडवकर (माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (तळसर, चिपळूण) यांच्यावरही रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरुण रेडीज यांचा रानडुकराच्या हल्ल्यात (चांदेराई, रत्नागिरी) मृत्यू झाला होता. त्यातील काहींना २० लाख, तर काहींना १५ लाखांची नुकसानभरपाई दिली होती. याव्यतिरिक्त गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.

इथे आहे वन्यप्राण्यांची दहशत – सह्याद्री खोऱ्यातील तळसर चिपळूण, पातेपिलवलीतर्फे वेळंब, शेवरवाडी नांदगाव, खानू नवीवाडी लांजा, तसेच फुरूस, पन्हाळकाजी दापोली, चिंचघर खेड, चांदेराई रत्नागिरी, दोडवली गुहागर, ताडील दापोली, साखरपा संगमेश्वर, पाथरट रत्नागिरी आदी ठिकाणी वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ले केले. या हल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular