28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriट्रान्सफॉर्मर दुरूस्तीची करा आता ऑनलाईन तक्रार

ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीची करा आता ऑनलाईन तक्रार

महावितरण कंपनीने राज्यभर मोहीम हाती घेतली.

ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने त्याची दुरूस्ती करण्याबाबतची तक्रार वीज ग्राहकांना तात्काळ देता येणार आहे. त्यासाठी महावितरणने अॅप विकसित केले आहे. त्या अॅपचा वापर करून माहीती द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून नवीन बसविण्यासंदर्भातील आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार महावितरण कंपनीने राज्यभर मोहीम हाती घेतली. माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात बिघडलेला ट्रान्सफॉर्मर बदलला जात आहे. तथापी, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी महावितरणच्या मोबाईल अॅपवरील सुविधा वापरणे ग्राहकांसाठी सोपे ठरू शकते. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीला विलंब होऊ नये यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असा उपाययोजना केल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहीती मिळाल्यानंतर तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येतो. यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या आहे.

अॅपवरून अशी करता येईल तक्रार – मोबाईलवर महावितरणचे अॅप उघडून त्यामध्ये नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा, त्यात ग्राहकाचे नाव व नंबर येथे क्लिक करा-ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो, याची माहिती भरा. संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून त्यात अपलोड करा आणि नोंद करा. सबमिट बटण दाबल्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल. ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular