24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriनक्की कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा ! जनता संभ्रमित

नक्की कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा ! जनता संभ्रमित

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरीअंट बद्दल जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. रत्नागिरीतील कोरोनाचा पॉझिटीव्हिटी दर आत्ता १० च्या खाली आला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरीअंटचे एकूण ९ रुग्ण असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरीअंटचे रुग्ण सापडल्याचा दावा आरोग्य मंत्र्यांनी केल्यावर प्रशासन हादरले. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेऊन डेल्टा प्लस व्हेरीअंटचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्याचा सांगितले. त्यामुळे जनतेमध्ये दोघांच्याही विरोधी दाव्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. दोघांपैकी नक्की कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा ! अशी द्विधा मनस्थिती होऊन रत्नागिरीमध्ये चर्चा रंगली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये अनुक्रमे ६ आणि ३ असे एकूण नऊ व्हेरीअंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरीअंट ऑफ इंस्ट्रेस्टचे रुग्ण सापडले. परंतु ते डेल्टा प्लसचे रुग्ण नव्हे. जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरीअंट या नवा स्ट्रेन सापडल्याचा लेखी माहिती आलेली नसल्याचे सरकारी छापाचे उत्तर आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिले आहे. पण आरोग्य यंत्रणेचे संगमेश्वर मधील काही गावांमध्ये हे रुग्ण सापडल्याचे म्हणणे असल्याने त्या क्षेत्राला कंटेंटमेंट झोन करून, त्या अनुषंगाने त्याचा फैलाव होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाने मे महिन्यात १०७ नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविले आहेत. राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. .

RELATED ARTICLES

Most Popular