24.7 C
Ratnagiri
Sunday, February 15, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriबसस्थानकाचे काम रेंगाळले काँग्रेसचे आज रत्नागिरीत आंदोलन

बसस्थानकाचे काम रेंगाळले काँग्रेसचे आज रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम गेले अनेक दिवस रखडले असून त्याचा निषेध म्हणून शनिवारी ८ एप्रिलला जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वा. रत्नागिरी बसस्थानकांवर हे आंदोलन होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह जागरूक नागरिकांनीदेखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे यांनी हे आवाहन जनतेला केले आहे. एक सामाजिक कार्य म्हणून काँग्रेस कार्यकर्ते हे आंदोलन करणार असून त्यामध्ये जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. आगाशे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular