29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiriपोलीस भरतीच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न - या प्रश्नाचे सर्व गुण मिळणार

पोलीस भरतीच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न – या प्रश्नाचे सर्व गुण मिळणार

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेत अनेक प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रश्न चुकीचे असल्याने या प्रश्नाचे सर्व गुण परीक्षार्थीना देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा २ एप्रिलला झाली. या लेखी परीक्षेमध्ये ए,बी,सी,डी असे ४ प्रश्नसंच होते. विशेष म्हणजे या चारही प्रश्नसंचांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. प्रत्येक प्रश्नसंचामधील काही प्रश्न चुकले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा गोंधळ उडाला. अखेर हे प्रश्नसंच चुकीचे असल्याचे डीएसपींच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांनी त्यानंतर या प्रश्नांचे सर्व गुण परीक्षार्थीना दिले जातील असा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular