21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीची जागा काँग्रेसलाच मिळावी - जिल्हाध्यक्ष अविनाश लाड

रत्नागिरीची जागा काँग्रेसलाच मिळावी – जिल्हाध्यक्ष अविनाश लाड

राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.

विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे त्या अनुषंगाने कोकणचे प्रभारी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी आणि इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी आले होते. सर्वांशी त्यांनी चर्चा केली. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभेसाठी आम्ही आग्रही आहोत. रत्नागिरी जागा काँग्रेसला हवी, अशी ठाम भूमिका आज सर्वांनी कोकण प्रभारी बी. संदीप यांच्याकडे मांडल्याची जिल्हाध्यक्ष यांनी दिली. माहिती काँग्रेसचे अविनाश लाड काँग्रेसभवन येथे कोकण प्रभारी बी. संदीप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सेल आणि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांना त्यांनी कानमंत्र दिला. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.

त्या अनुषंगाने काँग्रेसच्या इच्छुकांची मते प्रभारांनी जाणून घेतली. एकूणच पक्षाची जिल्ह्यातील राजकीय स्थिती काय, पक्षवाढीसाठी काय करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड म्हणाले, कोकणचे प्रभारी आले त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत जाणून घेतले. पाच विधानसभासंदर्भात माहिती घेतली. पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. तिन्ही विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याचा लेखाजोखा मांडणारा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर महायुती म्हणून पक्षाची योग्य भूमिका ठरेल; मात्र पक्षवाढीसाठी कामाला लागा म्हणून सांगितले; मात्र रत्नागिरीत काँग्रेसचा हात पाहिजे, अशी ठाम भूमिका आम्ही वरिष्ठांकडे मांडली.

RELATED ARTICLES

Most Popular