27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरी स्थानकाबाहेर काँग्रेसची घोषणाबाजी - 'भंगार है भंगार है एसटी महामंडळ भंगार है!'

रत्नागिरी स्थानकाबाहेर काँग्रेसची घोषणाबाजी – ‘भंगार है भंगार है एसटी महामंडळ भंगार है!’

‘भंगार है भंगार है एसटी महामंडळ भंगार है’, ‘कंत्राटदारा वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे’, एसटी महामंडळचा निषेध असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘जनतेला दिला धोका मग प्रशासनाला ठोका’, ‘आवाज कोणाचा सामान्य जनतेचा’, अश्या घोषणांनी रत्नागिरीचा एसटी स्टँड परिसर दणाणून गेला. रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनात यावेळी स्टॉपवर ताटकळत उभे असलेले नागरिकही सामील झाले होते.रत्नागिरी बस स्थानक अनेक वर्षे बंद स्थितीत आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या जनतेला उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एसटी स्टँड परिसरा कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे व मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व त्रस्त नागरिकांनी एसटी महामंडळ विरोधी हातात फलक घेऊन निदर्शने केली.

यानंतर विभाग नियंत्रक कार्यालयबाहेर उभे राहूनही घोषणांबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला होता. सुमारे ६ वर्ष पूर्वी १० कोटी रुपये देऊन हे काम कंत्राटदारांकडून करण्याचे ठरवले होते. तेव्हापासून आतापर्यंत जनतेचे हाल सुरू आहे. तसेच तेथे कोणतीही बाथरूम, टॉयलेटची सोय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आता पुन्हा तीन कोटी रुपये वाढवून देऊन सदर काम पूर्ण करून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. हा जनतेच्या पैशाचा गैरवापर आहे, असा आरोप महिला जिल्हाध्यक्ष अँड. अश्विनी आगाशे यांनी केला आहे. किमान आता तरी हे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा काँग्रेस पक्ष एसटी महामंडळ विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, अशा आशयाचे निवेदन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे यावेळी देण्यात आले.या प्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, सोशल मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, शहर अध्यक्ष रमेश शहा, रवींद्र खेडेकर, सीमा राणे, उदय मोहिते सुदेश ओसवाल इत्यादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular