25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriबदलत्या हवामानाचा रत्नागिरी हापूस आंब्याला फटका

बदलत्या हवामानाचा रत्नागिरी हापूस आंब्याला फटका

बदलत्या हवामानाचा व वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्याला बसत आहे. तापमान वाढीमुळे झालेल्या उष्माघाताचा फटका. आंब्याला बसल्याने बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडत आहेत. बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असल्याने बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलाने लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला आहे. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स रोगामुळे आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल, अशी आशा बागायतदारांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे. झालेल्या फळधारणापैकी जवळपास ७५ टक्के हापूस हा गळून पडत आहे. आता उरला सुरला हापूसही हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बागायतदारांचा यंदाचा हंगाम आर्थिक कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular