21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ना. रवींद्र चव्हाण यांनी दिला कानमंत्र

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ना. रवींद्र चव्हाण यांनी दिला कानमंत्र

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपमय वातावरण तयार करणे हे महत्त्वाचे आहे.

भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळाच्या निशाणीवर भाजपचा निष्ठावंत उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणजे शहर कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या भाजपचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना महाविजयाचा मंत्र दिला आहे. माळनाका येथे जयेश मंगल पार्क येथे शहर कार्यकारिणीची बैठक झाली. त्याप्रसंगी चव्हाण यांनी बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, शत प्रतिशत भाजपच्या दिशेने जाण्याकरिता नेतृत्वाने आदेश दिले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपमय वातावरण तयार करणे हे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे बघून लोकांना हे वातावरण तयार झाल्याचे जाणवले पाहिजे. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या १० घरांना भाजपाचे झंडे घरावर लावायला सांगा, व्यापारी लोकांना दुकानावर भाजपचा झेंडा फडकावयला सांगा. माझा परिवार भाजप परिवार असे म्हटले पाहिजे. मित्रपक्षांनाही भीती वाटली पाहिजे. युवकांची ताकद महत्त्वाची आहे. प्रत्येक बूथवर युवकांची जास्त संख्या दिसायला हवी. १४ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करावे. २०१४ ला युती तुटली आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि २०१९ ला युती झाली व भाजपा सरकार येऊ शकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.

स्वबळावर लढणे भाजपला फायदेशीर असून त्याकरिता कार्यकत्यांनी कामाला लागावे. या प्रसंगी बाळ माने यांनी सांगितले की, पक्षाने दिलेले सहप्रभारीपदाचे काम २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणार आहे. सर्व बूथ, सुपर वॉरियर्सची जबाबदारी पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. नवा भाजप महाविजयसाठी आम्ही सज्ज आहोत. यावेळी लोकसभा मतदारसंघ सहप्रभारी आणि रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सचिन वहाळकर, दादा ढेकणे, सतेज नलावडे, प्रशांत डिंगणकर, राजन फाळके, सुजाता साळवी, पल्लवी पाटील, दादा दळी यांच्यासमवेत शहर, जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular