27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeChiplunचिपळूणात आ. रोहित पवार यांच्या चौकशीचा तीव्र विरोध

चिपळूणात आ. रोहित पवार यांच्या चौकशीचा तीव्र विरोध

या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या इंडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. या ठिकाणी सुमारे तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला आमदार रोहित पवार आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी फुटीर गटा विरोधात राज्यभरात रान पेटवले आहे. राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्यांवर हो ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत.

राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला. यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात जेष्ठ नेते पक्षाचे उपाध्यक्ष व माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम, विधानसभा उमेदवार प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा दिपिकाताई कोतवडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईसभाई अल्वी, माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, अजम लभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ पवार, जिल्हा चिटणिस रोहन चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महमद पाते.

ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, महिला तालुकाध्यक्ष राधाताई शिंदे, शहराध्यक्ष रतनदादा पवार, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नियाज पाते, महिला शहराध्यक्षा रेहमत जबले, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, अर्बन बँक माजी चेअरमन सतिशआप्पा खेडेकर, शहर उपाध्यक्ष संजय तांबडे, भाई गुढेकर, मंदार चिपळूणकर, कादीर मुकादम, माजी नगरसेवक राजूशेठ कदम, फैसल पिलपिले, गुलझार कुरवले, राकेश दाते, फिरोज चौघुले अन्वर जबले, वासुआप्पा मेस्त्री, सिद्धिराज पाथरे, दिनेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular