27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriरत्नागिरी भाजीमार्केट इमारतीची उभारणी रखडणार - न्यायालयीन प्रक्रिया

रत्नागिरी भाजीमार्केट इमारतीची उभारणी रखडणार – न्यायालयीन प्रक्रिया

गाळेधारकांना भाजीमार्केटची इमारत मोकळी करून देण्याची नोटीस बजावण्यात आली.

रत्नागिरी पालिकेच्या जुन्या भाजीमार्केट इमारतीच्या उभारणीचे काम न्यायालयीन प्रक्रियेत रखडण्याची शक्यता आहे. भाजीमार्केटची इमारत फारच धोकादायक बनल्याने ती पाडून नवीन इमारत उभारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानुसार पालिकेने गाळे मोकळे करून देण्याची नोटीस गाळेधारकांना बजावली. या नोटीसविरुद्ध गाळेधारक न्यायालयात गेल्याने हे प्रकरणही न्यायप्रविष्ट होऊन नवीन इमारतीचे काम रखडण्याची शक्यता आहे. इमारतीतील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी २४ ऑक्टोबरला होणार आहे.

रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील जुन्या भाजीमार्केटच्या इमारतीच्या बांधकामाला ४० वषपिक्षा अधिक काळ लोटला आहे. ही जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याबाबत रत्नागिरी पालिकेने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यानंतर गाळेधारकांना भाजीमार्केटची इमारत मोकळी करून देण्याची नोटीस बजावण्यात आली. ही इमारत धोकादायक झाल्याने इमारतीचा वापर तत्काळ बंद करण्यासंदर्भात आदेश करणारी नोटीस बजावण्यात आली. या नोटिसीविरोधात ३ गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय रत्नागिरी पालिकेला इमारतीचा ताबा मिळू नये यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

या प्रकरणी पहिली सुनावणी नुकतीच झाली असून, पुढील सुनावणीची तारीख २४ ऑक्टोबर आहे. नवीन भाजीमार्केटची इमारतही फारच धोकादायक झाली असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल आला. त्यानुसार भाजीमार्केटची इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याची कार्यवाही सुरू झाली; परंतु काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असून आता हे प्रकरणही न्यायप्रविष्ट बनले आहे.

सुनावणी २४ ऑक्टोबरला – नोटिसीविरोधात ३ गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय रत्नागिरी पालिकेला इमारतीचा ताबा मिळू नये यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी नुकतीच झाली असून, पुढील सुनावणीची तारीख २४ ऑक्टोबर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular