30.4 C
Ratnagiri
Saturday, February 21, 2026

शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण

नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी...

नको शेलू नको वांगणी’ गिरणी कामगारांना घर मुंबईतच हवे

नको शेलू नको वांगणी गिरणी कामगारांना घर...

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

अजित पवार यांना बारामतीला घेवून गेलेल्या विमानामध्ये...
HomeChiplunकुंभार्ली घाटात अवघड वळणावर भला मोठा कंटेनर पडला बंद

कुंभार्ली घाटात अवघड वळणावर भला मोठा कंटेनर पडला बंद

वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा महत्त्वाचा आणि अत्यंत जवळचा मार्ग असलेला कुंभार्ली घाटात शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली. एका अवघड वळणावर भलामोठा मालवाहू कंटेनर बंद पडल्याने घाटाच्या दोन्ही बाजूकडून वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत वाहतूक सुरळित करण्याचे प्रयत्न सुरू होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून कुंभार्ली घाटाची निर्मिती झाली होती. या घाटाचा पर्यायी रस्ता इंग्रजांनी एका स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधून काढला होता. त्यानंतर या. महत्त्वाच्या घाटाचे काम पूर्ण झाले. परिणामी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कुंभार्ली घाटाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. अनेक दशके या घाटाचा प्रवासी तसेच व्यापारी, मालवाहतुकीसाठी जवळचा मार्ग म्हणून वापर होत आहे. अलिकडच्या काळात मात्र हा घाट सर्वच दृष्टीने असुरक्षेच्या कोंडीत सापडला आहे. घाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी त्याला कारणीभूत ठरत आहे.

घाटातील वाहनांची वर्दळ वाढल्याने पूर्वीचा असलेला अरूंद घाटरस्ता आता अपुरा पडू लागला आहे. शासनाने गुहागर-विजापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत केला आहे. या अंतर्गत रूंदीकरणही सुरु झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात कुंभार्ली घाटाच्या रुंदीकरणात इको सन्सेटीव्ह झोनसह या घाटाची भौगोलिक परिस्थिती अडचणीची ठरत आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने अशा अरूंद रस्त्यावरून ये-जा करतील अशी स्थिती आज देखील आहे. एका बाजूला सह्याद्रीचे उंच कडे तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्यांच्या मध्यातून तीव्र चढ-उतार आणि वळणे घेत हा घाटकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडत आहे. पाच दशकांपूर्वीची स्थिती आजही जैसे थे आहे. त्यातच या घाटाच्या देखभाल, दुरूस्तीवर करोडो रूपये खर्चनदेखील घाटाच्या दरीकडील बाजूच्या संरक्षक भिंती व कठडे असुरक्षित व धोकादायक ठरत आहेत.

तसेच कायमस्वरूपी संपूर्ण घाटरस्त्यामध्ये पडलेले खड्डे वाहनचालकांना आपली वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. अनेकवेळा या असुक्षित घाटातून प्रवासी वाहनांचे छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. तीव्र चढ-उतार व धोकादायक वळणे यातून वाहनावरील नियंत्रण सुटून घाटरस्त्यात होणारे अपघात अशा एकूणच परिस्थितीमुळे हा घाट धोकादायक बनला असल्याने गेल्या काही महिन्यांपासून या घाटात विविध कारणांनी झालेल्या अपघातांमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटमार्ग ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत. महिनाभरात तीन ते चारवेळा अपघातामुळे घाटातील वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी देखील, सकाळच्या सुमारासतीच परिस्थिती उद्भवली होती. दुपारपर्यंत वाहतूक सुरळित करण्याचे प्रयत्न सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular