22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriमिरजोळे, जांभूळफाटा येथील नाले दूषित

मिरजोळे, जांभूळफाटा येथील नाले दूषित

प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांना बोलावून ही परिस्थिती दाखवण्यात आली होती. तरीही त्यावर कारवाई झालेली नाही.

मिरजोळे एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात परिसरातील कंपन्यांतून प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने मिरजोळे जांभूळफाटा येथील ग्रामस्थांना त्रास होत आहे. हे पाणी सोडणाऱ्या कंपन्यांनी तातडीने उपाय योजना करावी, अन्यथा प्रदूषणाविरोधात धडक मोर्चा काढू, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. मिरजोळे एमआयडीसी परिसरातून जांभूळफाट्याकडे वाहणाऱ्या नाल्यात कंपन्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. प्रक्रियायुक्त पाणी वाहत जांभूळफाटा परिसरातील वस्तीत जाते. त्या पाण्यामुळे नाल्याजवळील विहिरी दुषित झाल्या आहेत. पाणी पिण्यास योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांसमोर संकट उभे आहे तसेच त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उभा राहिला आहे.

यापूर्वीही पाणी प्रदुषणाबाबत येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी विभाग यांच्याकडे निवेदन दिले होते. प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांना बोलावून ही परिस्थिती दाखवण्यात आली होती. तरीही त्यावर कारवाई झालेली नाही. पाणी दूषित करणाऱ्या कंपन्यांनीही या विभागांना जुमानलेले नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी आज व्यक्त केली. प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत हे सांडपाणी नाल्याद्वारे सुरूच आहे. परिसरातील मत्स्य प्रक्रियांचे हे पाणी असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे; मात्र मत्स्य प्रक्रिया कंपन्यांकडून तो नाकारण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरात उद्योगधंद्यांना ग्रामस्थांचा विरोध नाही; पण अशाप्रकारे प्रदूषण होत असेल तर त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. कंपन्यांनी सोडलेल्या प्रदूषित पाण्याची मंगळवारी (ता. ७) सायंकाळी पाहणी केली. या वेळी ग्रामस्थ हर्षराज पाटील, ओंकार मजगावकर, प्रवीण पवार, प्रीतम चव्हाण, दिनेश पाटील, वैभव पाटील, प्रथमेश पाटील, छब्या कीर, रत्नदीप पाटील, विकास पाटील, रोशन भाटकर, उमेश पाटील, वैभव जावकर, मीना ठीक, अक्षया खेडेकर, अजू पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular