26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriपर्ससीनद्वारे मासळीची लूट, पारंपरिक मच्छीमार संतापले

पर्ससीनद्वारे मासळीची लूट, पारंपरिक मच्छीमार संतापले

पारंपरिक मच्छीमारांची आहे तसेच पर्ससीन नेटद्वारे जोरदार बेकायदा मासेमारी सुरू आहे.

निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पारंपरिक मच्छीमारांसमोर मिनी पर्ससीन, पर्ससीन फेशिंगचे नवे संकट उभे ठाकले आहे. कोणतीही परवानगी नसताना मिनी सीनधारक किनाऱ्यावर बेसुमार सेमारी करत आहेत. पर्ससीन कांद्वारेही राजरोस बेकायदेशीर सेमारी सुरू आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारी धोक्यात आली असून, मच्छीमारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पारंपरिक मच्छीमार या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे वत्स्यविभागाने कारवाईसाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात मासेमारी सुरू नाल्यापासूनच बदलत्या हवामानाचा यावर परिणाम झाला.

पावसाळी हंगामातील बराचसा कालावधी फुकट गेला. आता चांगला रेपोर्ट मिळू लागल्याने बेकायदेशीर मासेमारीला उत आला आहे. कोकणातील परवाना नसताना मिनी पर्ससीनधारकांकडून किनाऱ्यावरच मासळीची लूट सुरू आहे. या बेकायदेशीर मासेमारीकडे मत्स्य विभाग लक्ष देणार का, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांची आहे तसेच पर्ससीन नेटद्वारे जोरदार बेकायदा मासेमारी सुरू आहे. १२ वावाच्या आतच पर्ससीनकडून बिनधिक्कत मासेमारी सुरू आहे. मासळीची ही लूट पारंपरिक मच्छीमारांच्या मुळावर आली आहे.

या बेकायदेशीर मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली; परंतु त्यांच्याकडूनही काही कारवाई होत नसल्याची खंत आहे. धाकदपटशाचा वापर करून काही मच्छीमार विनापरवाना पर्ससीन नौकांद्वारे मासेमारी करत आहेत. त्याला काही ठिकाणी एलईडीची जोड मिळाली असून, मच्छीमारांमधील अंतर्गत वाद भडकण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी मिरकरवाडा बंदरात एलईडीद्वारे मासेमारी करून आलेल्या नौकेवरील मासळी उतरवण्यात आली होती. त्यामुळे एलईडी मासेमारीला अधिकृतरित्या दुजोरा मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular