29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरत्नागिरीतील प्राणी संग्रहालयास उभारण्यासाठी सहकार्य - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयास उभारण्यासाठी सहकार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, 'रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे.

रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालय उभारण्याच्या विषयाला चालना मिळाली आहे. रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारणीबाबत विधानभवनात मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्राणीसंग्रहालय साकारता येईल. प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्यात येईल. देशातील अन्य प्राणी संग्रहालयांची पाहणी करत त्याच्या व्यवस्थापनाची माहिती करून घेतली जाईल. या प्राणी संग्रहालयामुळे कोकणातील पर्यटनवृद्धीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.’ पालकमंत्री उदय सामंत यांनी ही संकल्पना उचलून धरली आहे. मालगुंड येथे प्राणी संग्रहालयासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. मंत्री मुनगंटीवार यांनी याबाबत विविध मौलिक सूचना वनविभागाला दिल्यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संग्रहालयासाठी जागा उपलब्ध असून सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular