27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunतिवरे धरणग्रस्तांसाठी ८ कोटी ९६ लाख मंजूर, घरे बांधून देणार

तिवरे धरणग्रस्तांसाठी ८ कोटी ९६ लाख मंजूर, घरे बांधून देणार

पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने सिडकोकडून हा निधी मंजूर झाला आहे.

तिवरे गावातील ३२ धरणग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी सिडकोकडून ८ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने सिडकोकडून हा निधी मंजूर झाला आहे. पुढील कार्यवाहीसाठी सिडकोकडून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तिवरे धरण २ जुलै २०१९ ला फुटले. या घटनेत २३ जणांचा बळी गेला. त्यानंतर गावातील धरणग्रस्तांना घरे बांधून देण्याचे आश्वासन आमदार शेखर निकम आणि म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले होते. या कामासाठी सिद्धीविनायक न्यासाकडून ५ कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २४ घरांचे

जुलै २०२१ मध्ये लोकार्पण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या घरांचे उद्घाटन झाल्यानंतर उर्वरित ३२ घरांसाठी पाठपुरावा सुरू होता. यावेळी सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते होते. त्यांनी सिडकोच्या माध्यमातून उर्वरित घरांसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. हा निधी मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून ३२ घरे सिडकोकडून बांधून दिली जाणार आहेत. एका घरासाठी २८ लाखांचा खर्च अपेक्षित धरून ३२ घरांसाठी ८ कोटी ९६ लाख मंजूर झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular