कोरोना काळामध्ये जसे शारीरिक स्वास्थ्य जपणे गरजेचे असते, तसेच अगदी लहानांपासून ते मोठ्यांचे मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. कोरोनामुळे असणाऱ्या संचारबंदीमुळे सगळेजण एका घरात बंदिस्त झाले आहेत. अर्थात काळाची गरज पण आहे ती. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे आहे.
रत्नागिरी क्लब आणि परिचारिका वेल्फेअर मंचच्या वतीने “कोरोना काळातील मानसिक आरोग्य” या विषयावर प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. संदीप महामुनी यांनी ऑनलाइन व्याख्यान्याच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. डॉ. संदीप महामुनी हे पुण्यातील अतिशय प्रख्यात असे मानसोपचारतज्ञ असून, त्यांचे येरवडा जेलमध्ये मानसोपचारतज्ञ म्हणून सतत कार्यक्रम होत असतात. आपल्या व्याख्यानांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रकार अतिशय सोप्या आणि सर्वसामान्य लोकांना समजतील अशा भाषेमध्ये ते समजावून सांगतात. कोरोनामध्ये लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींची मानसिक अवस्था कशी असेल, आणि त्यावर पालकांनी साधलेला संवाद,प्रश्न यांची सोप्या भाषेत समर्पक रित्या त्यांनी उत्तरे दिली.
परीचारिका वेल्फेअर मंच यांच्यातर्फे दर महिन्याला परिचारिका आणि सर्वसामान्य जनतेला समाज उपयोगी पडेल असे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. जून महिन्यामध्ये मानसोपचारतज्ञ डॉ. संदीप महामुनी यांना निमंत्रित करण्यात आले होते. अनेक पालक आपल्या पाल्यांशी कसे जुळवून घ्यायचे, कोणत्या वयात त्यांच्याशी कशा प्रकारची वागणूक अपेक्षित आहे !, नुकत्याच वयात येणाऱ्या परंतु दहावी आणि बारावी सारख्या आयुष्याचा पाया रचणाऱ्या वर्षांमध्ये कोणते मानसिक आणि शारीरिक बदल होतात तसेच कोरोनाकाळामध्ये सगळ्याच गोष्ठी ऑनलाइन असल्याने किशोरवयातील आणि तरुण वयातील मुलं भरकटणार नाहीत ना ? यासाठी अनेक पालकांनी डॉक्टरांना प्रश्न विचारले आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये डॉक्टरांनी असे सांगितले की, कोणत्याही वयोगटातील विद्यार्थ्यांशी सतत संवाद ठेवून लैंगिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती देणे ही पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. बाहेरून काही चुकीचं ज्ञान अवगत होण्यापेक्षा पालकांनी विश्वासाने सांगितलेलं योग्य ठरेल.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये परिचारिका वेलफेअर मंचतर्फे पूर्वा आंबेकर, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या परिसेवीका यांनी डॉ.संदीप महामुनी यांची ओळख करून देत निवेदन केले, घाडी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. द्राक्षे आणि परिचारिका संघटनेच्या स्नेहा बने आदींची या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली.