25.6 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriविद्यार्थ्याला दोनवेळा डोस देण्यात आल्याचे वृत्त व्हायरल

विद्यार्थ्याला दोनवेळा डोस देण्यात आल्याचे वृत्त व्हायरल

कोविड-१९  लसीकरण १५  ते १८  वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना लहान मुलांच्या मनामध्ये इंजेक्शन बद्दल नी भीती असल्याने ती घाबरुन जातात.

रत्नागिरी जिल्हयामधील चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथे १५  ते १८  वयोगटातील मुलांचे कोविड-१९ लसीकरण सत्र दिनांक ०५ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आले. यावेळी एका विद्यार्थ्याला दोन वेळा डोस देण्यात आल्याचे वृत्त व्हायरल झाले होते, मात्र त्याबाबत आरोग्य विभागाने ते वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला आहे.

१५ ते १८ वयोगटातील या लसीकरणादरम्यान एक विद्यार्थी लस देत असतानाच अचानक घाबरुन गेल्यामुळे तो उठून उभा राहिला,  त्यामुळे त्याच्या हाताला सुई टोचल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याला पुन्हा जागेवर बसवून लस देण्यात आली असे प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी स्पष्ट केले.

परंतु, सदरचा विद्यार्थी लसीचा डबल डोस देण्यात आला असे समजून घाबरुन गेल्यामुळे या विद्यार्थ्याला देखरेखीकरिता डॉक्टरांच्या निगराणीखाली उपजिल्हा रुग्णालय कामथे येथेच दाखल करण्यात आले आहे. कोविड-१९ लसीकरण सत्रामध्ये कोणात्याही विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन वेळा डोस देण्यात आलेला नाही. तसेच सदर दिवशी लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांबद्दल संपूर्ण माहिती घेतली असता, त्यावेळी देण्यात आलेल्या लसीचा त्रास कोणालाही झालेला नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले आहे.

कोविड-१९  लसीकरण १५  ते १८  वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना लहान मुलांच्या मनामध्ये इंजेक्शन बद्दल नी भीती असल्याने ती घाबरुन जातात. त्यामुळे याची विशेष दक्षता लस टोचक व इतर कर्मचार्यांनी घ्यावी असे डॉ.श्री. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.रत्नागिरी यांनी सांगितले. त्यामुळे व्हायरल झालेली बातमी ही तथ्यहीन आहे, कोणत्याही विद्यार्थ्याला दोन वेळा लसीकरण करण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular