23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriसुरक्षेच्यादृष्टीने रत्नागिरी जिल्हयात ७५०० सीसीटीव्ही बसवणार- पोलीस महानिरीक्षक

सुरक्षेच्यादृष्टीने रत्नागिरी जिल्हयात ७५०० सीसीटीव्ही बसवणार- पोलीस महानिरीक्षक

रत्नागिरी जिल्हा अधिक संवेदनशील असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्याअंतर्गत ७५०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचा एक वेगळा नियंत्रण कक्ष तयार करून, कुठे काही समस्या असतील तर, किंवा कुठे काही वाहतूक कोंडी किंवा अन्य काही झाल्यास कक्षातूनच त्याचे निरीक्षण करून, ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देऊन ती समस्या सोडविणे शक्य होणार आहे. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन किंवा शासनाच्या मदतीने उभारला जाईल, अशी घोषणा कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी केली.

अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील गुन्ह्यांसंदर्भात सर्वांत कमी दर असून जिल्ह्याची ही चांगली कामगिरी आहे. गुन्हे प्रलंबितचा जिल्ह्याचा दर अवघा १७ ते १८ टक्के इतका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गृह पोलिस उपअधीक्षक एस. एल. पाटील आदी उपस्थित होते.

कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक मोहिते पुढे म्हणाले कि, पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीनिमित्त मी जिल्ह्यात होतो. जिल्ह्यात गुन्हेगारीचा दर फारच कमी आहे. वर्षाला सुमारे १३०० गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हेगारी दर वाढला तर आपण तक्रारी दाखल झालेल्या नागरिकांना न्याय देऊ शकतो. त्यामुळे गुन्हेगारी दर १६०० पर्यत जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. गुन्हे उघड आणण्याचे प्रमाणही ८० टक्के आहे. हे प्रमाण देखील चांगले आहे. जिल्हा पोलिस दलाचे काम चांगले आहे. अशी कौतुकाची थाप सुद्धा त्यांनी रत्नागिरी पोलिसांना दिली.

त्याचप्रमाणे रत्नागिरीला लाभलेला समुद्रकिनार्यामुळे तिथल्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा मोठा आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही त्या सुरक्षिततेकडे लक्ष देतो. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आधी गुजरात येथे ट्रेनिंग देण्यात येत असे, परंतु आता कोकण परीक्षेत्रामध्ये ७ दिवसांचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular