24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeMaharashtraखाडी पट्ट्यातील नोंदणी नसलेल्या अनेक जागा आता होणार नोंदणीकृत

खाडी पट्ट्यातील नोंदणी नसलेल्या अनेक जागा आता होणार नोंदणीकृत

शासनाच्या समुद्र व खाडीकिनारी असणार्‍या महसुली गावांची अंतिम सीमा रेषा ते समुद्राची उच्चतम भरती रेषा या दरम्यान तयार झालेल्या अनेक जागांची नोंद महसूल दफ्तरी नसल्याचे निदर्शनास आले आहे. या जागांची नोंद,  नकाशे करण्याच्या द़ृष्टीने महसुली सर्वेक्षण व मोजणी करण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खाडी पट्ट्यातील नोंदणी नसलेल्या अनेक खाजण जमिनी, कांदळवनाच्या जागा आता नोंदणीकृत होणार आहेत.

महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली असून या लगत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी समुद्राजवळच्या गावांची अंतिम सीमारेषा निश्चित झालेली असून महसूल दफ्तरी त्यांच्या नोंदी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात खाड्या, नद्यांमधून वाहून येणार्‍या गाळामुळे व भरती-ओहोटीमुळे गावांची अंतिम सीमा रेषा ते समुद्राची उच्चतम भरती रेषा यामध्ये छोटेमोठे भूभाग तयार झाले आहेत. या भूभागांचे महसूल दफ्तर तयार झालेले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

मुंबईत अशा पध्दतीने तयार झालेल्या काही जमिनींचे दफ्तर तयार करण्याबाबत मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनास प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर मुंबई बरोबरच राज्याच्या किनारपट्टीवरील भागातही अशाच पध्दतीने किनारपट्टीवर भूभाग तयार झाले आहेत. या जागांचे महसूल दफ्तर तयार करण्याच्या दृष्टीने या जमिनींची मोजणी करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

बंदरांकडे, समुद्राकडे, खाडीकडे जाणारे सार्वजनिक रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन, वीजवाहिन्या संबंधित क्षेत्र तसेच सार्वजनिक वहिवाटीचे हक्क अबाधित ठेवण्याबाबतची योग्य नोंदी अभिलेखात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जागांची मोजणी करताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, एमसीझेडएमए,  सीझेडएमए यांनी निश्चित केलेली समुद्राची उच्चतम भरती रेषा, निम्नतम भरती रेषा यांचे नकाशे, तसेच कांदळवन अधिसूचित क्षेत्र व सीआरझेडच्या तरतुदींचा देखील विशेषत:  विचार लक्षात घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयात या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी नियमानुसार कारवाई करण्याच्या स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular