28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeEntertainmentअक्षय कुमारने मागितली चाहत्यांची हात जोडून माफी

अक्षय कुमारने मागितली चाहत्यांची हात जोडून माफी

मला माफ करा. मी माझे चाहते. हितचिंतकांची माफी मागतो.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारची एक पान मसाल्‍याची जाहिरात प्रसिद्‍ध झाली, त्यामध्‍ये तो शाहरुख खान आणि अजय देवगण यांचे स्‍वागत करताना दिसतो. प्रथमच बॉलीवूडमधील तीन मोठे कलाकार एका जाहिरातीमध्‍ये दिसले होते. अजय देवगण हा पान मसाला जाहिरातीमध्‍ये दिसला आहे. यानंतर शाहरुख खानही या जाहिरातीमध्‍ये दिसला होता.

अभिनेता अक्षय कुमार नेहमी आपल्‍या नव्‍या सत्य कथेवर किंवा सूचक विषयाच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतो. त्‍याची बॉलीवूडमध्‍ये ओळख सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता अशी देखील आहे. सध्‍या अक्षय कुमारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ती एका पान मसाल्‍याच्‍या जाहिरातीमध्‍ये काम केल्‍याने तो चर्चेचा आणि त्यासोबतच टीकेचा विषय झाला आहे. या जाहिरातीमध्‍ये दिसल्‍याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. सगळीकडून चाहत्‍यांनी नाराजगी व्यक्त करून टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर त्‍याने याबाबत महत्त्‍वाचा निर्णय घेतला आहे.

अक्षय कुमारने आपल्‍या सोशल मीडिया अकाउंटवरुन पान मसाला जाहिरातीवरुन ट्रोल झाल्याने एक पोस्‍ट शेअर केली आहे. त्‍यामध्ये त्याने आपल्‍या चाहत्‍यांची हाथ जोडून माफी मागितली असून,  संबंधित पान मसालाचा ब्रँड अँबेसिडर यापुढे राहणार नसल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे.

आपल्‍या पोस्‍टमध्‍ये अक्षय कुमारने चाहत्‍यांना म्‍हटलं आहे की, “मला माफ करा. मी माझे चाहते. हितचिंतकांची माफी मागतो. मागील काही दिवस सोशल मीडियामध्‍ये माझ्‍याबद्‍दल आलेल्‍या प्रतिक्रियांमुळे मी प्रभावित झालो आहे. मी कधीच तंबाखूजन्‍य पदार्थ सेवन करत नाही आणि अशा पदार्थांना प्रोत्‍साहन दिले जाईल, असे वर्तन केलेले नाही. पान मसाल्‍याच्‍या जाहिरातमध्‍ये काम केल्‍यामुळे तुमच्‍या भावना दुखावल्‍या, त्या भावनांचा मी सन्‍मान करतो. त्‍यामुळे मी अत्‍यंत विनम्रपणे यातून माघार घेत आहे. या जाहिरातीमधून मिळालेले मानधन मी कोणत्यातरी समाज कार्यासाठी दान करेन. परंतु, सध्या संबंधित पान मसाला कंपनीशी करार केलेला असल्याने, जाहिरात करार असेपर्यंत दाखवण्यात येऊ  शकते. भविष्‍यात मी कोणत्‍या जाहिरातीमध्‍ये काम करायचे हे संपूर्ण विचाराअंतीच ठरवेन, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular