राष्ट्रीय आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीचे दर हे कालपासून निश्चित करून दिले आहेत. सध्या भारतामध्ये तीन वेगवेगळ्या लसी त्या नागरिकांना दिल्या जात आहेत. प्रत्येक लसीचे दोन डोस घ्यावयाचे आहेत आणि नागरिक ज्या लसीचा डोस पहिला घेतील त्याच लसीचा दुसरा डोस नागरिकांनी घ्यावा असे राष्ट्रीय आरोग्य विभागाने सांगितले आहे.
काल झालेल्या राष्ट्रीय धोरणानुसार एकूण ७५ टक्के डोस एक केंद्र सरकार खरेदी करणार आहेत आणि उरलेले २५ टक्के डोस खाजगी क्षेत्रांमध्ये अर्थात खाजगी रुग्णालयांमध्ये देण्याची परवानगी दिली गेली आहे.
नवीन लसीचे दर हे खालीलप्रमाणे,
- कोविशील्ड : ₹ ७८०
- कोवैक्सीन : ₹ १४१०
- स्पूतनिक व्ही : ₹ ११४५
ज्या लोकांना शक्य आहे किंवा जे लोक आर्थिक दृष्ट्या सबळ आहेत त्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये लस घेतली तरी चालणार आहे. लसीच्या वरील दरात व्यतिरिक्त पाच टक्के जीएसटी हा त्यावर बसणार आहे, तसेच खाजगी रुग्णालयांना प्रत्येक डोस साठी जास्तीतजास्त दीडशे रुपये सर्विस चार्ज घेण्याची सौलत देण्यात आली आहे. ह्या शासनाच्या धोरणामुळे लसीकरणाच्या नावाखाली जास्त लूट करणार्या खाजगी रुग्णलयांना आळा बसणार आहे.
वरील दर हा फक्त खाजगी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीसाठी आहे. शासनामार्फत ह्या लसी मोफत देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने लसीकरणाची मोहीम जलद गतीने सुरू केली आहे त्यासाठी काल दिनांक ९ जून रोजी ७४ कोटी लसींची ऑर्डर ही लस बनवणार्या कंपन्यांना शासनाने दिली आहे.