25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriमाध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे आदेश

माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे आदेश

कार्यतत्पर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी परीक्षेसंबंधी नियुक्त लोकांचे तालुकानिहाय नियोजन करून, संबंधित कर्मचाऱ्यांचे शासकीय कोरोना लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करण्यात यावे असा आदेश जारी केला आहे. 

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापन संघाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीची लगेचच दखल घेत जिल्हधिकरी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना बोर्ड परीक्षेशी संबंधित जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापन संधाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले आहे.

LAXMINARAYAN MISHRA
District Collector & Magistrate – Ratnagiri

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची लसीकरण मोहीम राबविण्यात आली परंतु, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश नसल्याने ते थांबवण्यात आलेले. परंतु, आत्ता येणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक असणार्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्यावर कार्यतत्पर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी परीक्षेसंबंधी नियुक्त लोकांचे तालुकानिहाय नियोजन करून, संबंधित कर्मचाऱ्यांचे शासकीय कोरोना लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करण्यात यावे असा आदेश जारी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular