अवैध सावकारीच्या विरोधात चिपळूण तालुक्यातील दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सौ. परवीन सोहेब मुलानी (अलोरे मुस्लिम मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) तसेच इकबाल गनी खेरटकर (खेर्डी, विकासवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. शहरातील खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील एका महिलेने पोलिस आणि सहाय्यक दुय्यम निबंधकांकडे सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती.
शहरात खासगी सावकारांचा सुळसुळाट आहे. अडचणीत सापडलेल्यांना सावकार दरमहा पाच ते ५० टक्के दराने कर्ज देतात आणि नंतर पठाणी पद्धतीने व्याज वसुली करून कर्जदारांची पिळवणूक करतात. व्याजाचे पैसे देण्यास उशीर झाल्यास कुटुंबीयांनादेखील त्रास दिला जात होता. यामधून शहरात काही गुन्हेदेखील घडले. घेतलेले कर्ज आणि व्याज परत करताना कर्जदाराला तारेवरची कसरत करावी लागत होती. नोकरी आणि उद्योगधंद्यातून मिळालेली रक्कम सावकारांच्या खिशात जात होती. जिल्ह्यात असे प्रकार घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय लकर्णी यांनी सावकारीच्या विरोधात पूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर एका तक्रारदाराने रवीन मोहेब मुलानी (अलोरे मुस्लिम मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) तसेच इकबाल गनी खेरटकर (खेडीं, विकासवाडी, ता. चिपळूण, जि. लागिरी) यांच्याविरुद्ध पोलिस तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी चिपळूण या कार्यालयाकडे सावकारीबाबतची तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांची चौकशी करण्यासाठी नेमले. या पथकाने दोघांच्या घरांची झाडाझडती घेतल्यानंतर तेथे तक्रार अर्जात नमूद मुद्द्यांप्रमाणे आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून त्यानुसार दोघा संशयितांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.