छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभा करणारी रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. शहराचा पर्यटन विकास अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतील ही शिवसृष्टी आहे. या ठिकाणी मोठ्या संखेने शाळा, महाविद्यालयांच्या सहली सध्या भेटी देत आहेत. छत्रपती शिवराय व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर हजारो पर्यटक दरवर्षी भेट देऊन किल्ल्यावरील भगवती देवीचे दर्शन घेत असतात. या किल्ल्यामध्येच मंत्री सामंत यांच्या दूरदृष्टीतून शिवसृष्टी उभारली आहे. सध्या या ठिकाणी कामगारवर्ग शिवसृष्टी पूर्णत्वाला नेण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. किल्ल्याच्या तटबंदीसारखे दिसणारे शिवसृष्टीचे भव्य आकर्षक प्रवेशद्वारच पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. हे प्रवेशद्वार सेल्फीपॉईंट ठरत आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड, खांदेरी, जंजिरा, सुवर्णदूर्ग, जयगड यासारख्या किल्ल्यांची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे.
पर्यटनदृष्ट्या ही शिवसृष्टी महत्वाची ठरली आहे. रत्नागिरीतील भगवती मंदिराशेजारी ‘रत्नदुर्ग शिवसृष्टी’ साकारली आहे. या शिवसृष्टीने डोळ्याचं पारणं फिटत आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी साकारली आहे. ही शिवसृष्टी रत्नागिरीतील आकर्षणाचं स्थान बनत चाललं आहे. किल्ल्याच्या तटबंदीसारखे दिसणारे शिवसृष्टीचे भव्य आकर्षक प्रवेशद्वार तयार केले आहे. हे प्रवेशद्वार सेल्फीसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरत आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड, खांदेरी, जंजिरा, सुवर्णदूर्ग, जयगड सारख्या किल्ल्यांची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ही शिवसृष्टी महत्त्वाची ठरणार आहे. या शिवसृष्टीमध्ये ८ जलदुर्गासह रायगडची प्रतिकृती आहे. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. शिवकालीन मंदिर, शिवकालीन गाव आणि राजवाड्याची प्रतिकृती देखील साकारली आहे.
आरमारातील लढाऊ जहाजाची प्रतिकृती तसेच जहाजाजवळ दीपगृहही उभारण्यात आलं आहे. हा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. हा संपूर्ण परिसर इतका सुंदर आहे की दिवसभर तुम्ही येथे राहून निसर्गसौंदर्यही न्याहाळू शकता. सकाळी भगवती मंदिर फिरुन शिव शंकराच्या दर्शनानंतर सायंकाळी रत्नदुर्ग शिवसृष्टी’ पाहण्यासारखी आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टीतील नजारा पाहून पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळत असल्याने रत्नागिरीच्या सौंदर्यात अजून वाढ झाली आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी ज्ञानवर्धक आणि ऐतिहासिक अशी असल्याने मोठ्या संख्येने सध्या या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांच्या सहली सध्या भेटी देत आहेत.

