25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिवाळी सुटी

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिवाळी सुटी

शासकीय सुट्या जोडून आल्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत आणखीन भर पडलेली होती.

दिवाळी सुट्यांसाठी पर्यटकांची पावले कोकणातील समुद्र किनारे आणि धार्मिक पर्यटन स्थळांकडे वळलेली आहेत. त्यामुळे गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. सर्वच किनाऱ्यावर जीवरक्षक, स्थानिक विक्रेते, पोलिस कर्मचारी यांचे लक्ष होते. गणपतीपुळेत तीन दिवसात ६० हजार पर्यटकांनी श्रींच्या मंदिरात दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. गुहागर किनारी सायंकाळी सात वाजल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना समुद्रात आंघोळ करण्यास नकार दिला. दिवाळीची पहिली अंघोळ झाल्यानंतर सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच पर्यटन स्थळांकडे वळू लागलेली आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत सुट्या असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यासह बेळगाव येथील पर्यटकांनी गणपतीपुळेला भेट दिली. पर्यटकांचा राबता आजही कायम आहे. त्यामुळे लांबलचक स्वच्छ, सुंदर समुद्र चौपाटी, प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटनस्थळांमुळे कोकणाकडील पर्यटकांची ओढ कायम आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. श्रींचे दर्शन घेऊन पर्यटक किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्टस्चा आनंद घेताना दिसतात.

शनिवार, रविवार शासकीय सुट्या जोडून आल्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत आणखीन भर पडलेली होती. या कालावधीत सलग दोन दिवस सरासरी २२ हजार पर्यटकांनी गणपतीपुळेला भेट दिली. तर सोमवारी १७ हजार पर्यटक येऊन गेल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक पर्यटकांनी मुक्काम केल्यामुळे लॉजिंग वाल्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. गुहागर किनारा सुरक्षित असल्यामुळे सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटींग, घोडेस्वार, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसते. समुद्रात सुरक्षितपणे आंघोळ करता यावी म्हणून नगरपंचायतीकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंदर विभागाकडून ठेवलेले सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी समुद्रात आंघोळ करणाऱ्या पर्यटकांना आणि किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकांना सायंकाळी बाहेर काढतात. त्यामुळे पर्यटकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे गुहागरच्या पर्यटनाला खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेरीबोटींना पसंती – परचुरी खाडीत कोकणातील पहिलीच हाउसबोट सुरू झाली असून त्या सेवेला पर्यटकांनी चांगली पसंती दिली आहे. शिवाय मगर सफर देखील सर्वांना आकर्षणाचे झाले आहे. दाभोळ – धोपावे फेरीबोट, तवसाळ – जयगड फेरीबोटीबरोबरच परचूरी खाडीत काही दिवसांपूर्वीच फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आलेला पर्यटक केवळ गुहागर शहरामध्येच न राहता तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विखुरला गेला आहे.

वीजपुरवठा सतत खंडित – चार दिवसांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या वादळाचा फटका गणपतीपुळेला बसला. विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठाच खंडित झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे दोन दिवस लॉजिंग व्यावसायिकांची मोठी अडचण झाली. जनरेटरवर वीजपुरवठा सुरू ठेवण्याची वेळ आली होती. काल वीज सुरू झाली असली तरीही त्यामध्ये वारंवार अडथळे येत होते.

RELATED ARTICLES

Most Popular