29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunवीस वर्षे रखडलेला कुडप धरण प्रकल्पचा प्रश्न मार्गी

वीस वर्षे रखडलेला कुडप धरण प्रकल्पचा प्रश्न मार्गी

२००४ मध्ये या धरणाला प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली.

गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या कुडप धरणाच्या बुडित क्षेत्रात हद्द बदलण्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने अखेर मार्गी लागला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बुडित क्षेत्रात हद्द कुंभारवाडीच्या वरच्या बाजूस स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झाल्यानंतर जलसंपदाचे कार्यकारी संचालक अतुल कपाले यांनी आमदार निकम यांची भेट घेऊन बदललेल्या हद्दीची पाहणी केली. यामुळे तब्बल ४० कोटी खर्चाचे हे धरण उभारणीचा प्रश्न निकालात निघाला असून, लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे. कुडप येथे धरण बांधण्याची मागणी ही पूर्वीपासूनची आहे.

२००४ मध्ये या धरणाला प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, धरणाच्या बुडित क्षेत्रात गावातील जास्तीत जास्त भातशेती बाधित होत असल्याने, ती हद्द ही कुंभारवाडी जवळ बदलून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. त्यानंतर झालेल्या विरोधामुळे धरणाचे काम रखडले होते. पुढे आमदार शेखर निकम यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे धरणी हद्द स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. आता ग्रामस्थांच्या मागणीनुसार धरण बुडित क्षेत्रात हद्द कुंभारवाडीच्या वरच्या बाजूस नेण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न निकालात निघाल्यानंतर शनिवारी जलसंपदाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपविभागीय अभियंता विपुल खोत आदींनी सावर्डे येथे आमदार निकम यांची भेट घेऊन या धरण बांधकामासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर स्थलांतरित करण्यात आलेल्या हद्दीची या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणीही केली.

RELATED ARTICLES

Most Popular