33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeChiplunचिपळूणात लवकरच वाहतुकीची स्वतंत्र शाखा

चिपळूणात लवकरच वाहतुकीची स्वतंत्र शाखा

अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करून रात्रीची गस्त वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चिपळूण शहरासाठी वाहतुकीची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात येईल तसेच त्यासाठी पूर्ण वेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नागरिकांच्या अनौपचारिक बैठकीत दिली. तसेच चिपळूण शहर परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करून रात्रीची गस्त वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी चिपळूण पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. याचवेळी चिपळूण सिटीजनस् मुव्हमेंटच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. यावेळी चिपळूण शहरातील वाढत्या वाहतुकीचा समस्या बाबत त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली.

चिपळूण शहरात सध्या वाहतुकीच्या अनेक समस्या वाढल्या असून त्या दृष्टीने इथे पूर्ण वेळ स्वतंत्र कार्यालय सुरू करावे तसेच चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी एकत्रित बैठक घेऊन् घेऊन समस्येचे निराकरण करावे, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व नागरिकांच्या आवाहनाचा विचार करून चिपळूण शहरांमध्ये स्वतंत्र शाखा सुरू करून त्यासाठी स्वतंत्र ऑफिसर नेम ण्याची त्यांनी माहिती दिली. याचवेळी अंमली पदार्थ संदर्भातली मोहीम अधिक तीव्र करून शाळाभोवतींच्या ज्या टपऱ्या आहेत त्यावरही लक्ष ठेवण्याचं सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रात्रीच्या गस्त वाढवण्याच्याही त्यांनी सूचना देत ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, त्यावरही लक्ष ठेवण्याचे त्यांनी सूचित केले.

याचबरोबर लवकरच नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी बैठक करून शहरातील रस्ते पार्किंक, नो पार्किंगचे बोर्ड तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पट्टे मारणे, वनवे याबाबत चर्चा करू व निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्हीबाबत आपण पाठपुरावा करू असेही, कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच हायवेचा सर्विस रोडचं तीन ते चार मीटर रुंदीकरण करण्याबाबत आपण हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊ अशी ही महत्त्वाची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली याचवेळी काही नागरिकांनी आतापर्यंत पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे तसेच राजेंद्र राजमाने यांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.

बैठकीला उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे माजी नगरसेवक शशिकांत मोदी सतीश आप्पा खेडेकर, माजी नगराध्यक्ष सूचय रेडीज, संदेश मोहिते तसेच चिपळूण सिटीजन मुव्हमेंटचे सतीश कदम, नाझीम अफवारे, डॉक्टर रहमत जबले, रुही खेडेकर, आदिती देशपांडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular