24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeKhedझाडे न लावणाऱ्या कंपनीला सुनावले - आमदार निकम

झाडे न लावणाऱ्या कंपनीला सुनावले – आमदार निकम

ठेकेदार कंपनीने दहा टक्केसुद्धा लागवड केलेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम ते असुडें या दरम्यान चौपदरीकरणासाठी सुमारे २२ हजार वृक्षांची तोड करण्यात आली. त्या बदल्यात ठेकेदार कंपनीने दहा टक्केसुद्धा लागवड केलेली नाही. यावरून आमदार शेखर निकम यांनी वृक्ष लावगड करणाऱ्या महामार्ग ठेकेदार कंपनीला सुनावले. महामार्गावर योग्यप्रकारे वृक्ष लागवड होत नाही. त्यामुळे थातुरमातुर उत्तरे न देता नियोजनपूर्वक झाडे लावण्यात यावीत अन्यथा चिपळूणची जनता रस्त्यावर उतरले, असा इशारा आमदार शेखर निकम यांनी महामार्ग वृक्ष लागवड आढावा बैठकीत दिल्या.

आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथे वृक्ष लागवडीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वृक्ष लागवडाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. नियमानुसार वृक्ष लागवड व्हावी तसेच झाडे लावलेली जगली पाहिजेत, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार कंपनीला आमदारांनी दिल्या. योग्य पद्धतीने वृक्ष लागवड न झाल्यास चिपळूणची जनता रस्त्यावर उतरेल, असेही सांगितले. सुमारे दोन तास वृक्ष लागवडीबाबत विविध खात्याच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावर्षीच्या पावसात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, वनविभाग, रोपवण अधिकारी यांनी वृक्ष लागवडीसाठी चांगले काम होईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला वृक्षप्रेमी शौकतभाई मुकादम, शहनवाज शहा, उदय ओतारी, सावर्डे उपसरपंच जमीर मुल्लाजी, अशोक पवार, गटविकास अधिकारी, वनविभाग, नगर परिषद मुध्याधिकारी, रोपवण अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी असे विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular