26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriसायबर सुरक्षा काळाची गरज, डॉ. गर्ग आणि टीमचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सायबर सुरक्षा काळाची गरज, डॉ. गर्ग आणि टीमचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. गर्ग यांनी सर्वाधिक ऑनलाईन असणाऱ्या तरुण पिढीला उद्देशून त्यातील फायदे आणि सोबतच मोबाईलच्या अति वापराचे धोके समजावून सांगितले.

सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा याबाबत युवावर्गामध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे. अनेकदा विद्यार्थी मोबाईल, संगणक आणि इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने, काहीतरी चूक भूल होण्याची शक्यता असते. आणि त्याच साठी योग्य वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत रा. भा.शिर्के हायस्कूल आणि कनिष्ठ महाविदयातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर साक्षरता व्हावी यासाठी “एहसास” हा सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी डॉ. गर्ग यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस , नितीन पुरळकर, निरीक्षक तुषार पाचपुते,  पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गमरे आदी उपस्थित होते. शिर्के हायस्कुलकडून उपमुख्याध्यापक रमेश चव्हाण, पर्यवेक्षक के. डी. कांबळे,  प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक नथुराम देवळेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख श्रीनिवास जोशी  यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. गर्ग यांनी सर्वाधिक ऑनलाईन असणाऱ्या तरुण पिढीला उद्देशून त्यातील फायदे आणि सोबतच मोबाईलच्या अति वापराचे धोके समजावून सांगितले. सध्या बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच केले जातात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, किती सतर्क राहिले पाहिजे हे सविस्तरपणे सांगितले. सोशल मीडिया हा जसा चांगला तसाच त्याचे दुष्परिणाम सुद्धा डॉ. गर्ग यांनी सांगितले.

कोणताही व्यवहार करताना येणारा व्हेरीफिकेशन ओटीपीबाबत त्यांनी विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दुचाकी चालवताना कोणते नियम पाळले पाहिजेत,  हेल्मेट किती आवश्यक आहे,  वाहन परवान्याची गरज, वयोमर्यादा का आखून दिली आहे  याबद्दल आवश्यक ती माहिती पुरवली. नितीन पुरळकर यांनीही सायबर सुरक्षेबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन रुची दळी यांनी तर आभार प्रथमेश भागवत यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular