26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeMaharashtraबंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, ४ दिवस पावसाचे

बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ, ४ दिवस पावसाचे

समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात दाना नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पुढचे ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

ही स्थिती पुढील २ दिवसांमध्ये भारताच्या किनाऱ्यापासून दूर पूर्व-वायव्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही भागात पुढील २ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मुंबई-ठाण्यातही चक्रीवादळाचा थेट परिणाम दिसत नसला, तरी हवामानात बदल होत आहे. आज मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि उपनगरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या उत्तर लक्षद्वीप आणि अंदमानवर चक्रीवादळाची स्थिती आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई आणि ठाणे- उपनगर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यभरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागने दिला आहे. नगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

तर मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आयएमडी मधील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे. चक्रीवादळ २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर आदळण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका फक्त भारतालाच बसणार असे नाही तर या चक्रीवादळाचा परिणाम आपल्या देशासह शेजारील राष्ट्रांना देखील बसण्याची शक्यता आहे. बांगलादेश आणि म्यानमारला सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसेल आणि यामुळे अतिवृष्टी सारखा पाऊस होईल असा अंदाज आहे. यामुळे या संबंधित भागांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular