26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeChiplunगुहागर विधानसभेमधील महायुतीचा उमेदवारीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात

गुहागर विधानसभेमधील महायुतीचा उमेदवारीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात

गुहागर विधानसभेच्या उम`दवाराबाबत सर्वांना एक उत्सुकता लागून राहिली आहे.

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कालावधी अगदी नजीक येऊन ठेपला आहे पारीसुद्धा अजून काही विधानसभेमध्ये उमेदवारांची राज्योषणा झालेली नाही. फक्त तर्क वितर्क आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये गुहागर विधानसभेमध्ये महायुतीच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी मिळणार याचं कोड अजून गुलदस्त्यात आहे. भाजपच्या वतीने माजी आ. डॉ. विनय नातू यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. मात्र अचानक शिंदे गटाचे विपुल कदम यांचे नाव समोर आल्यानंतर पुन्हा भाजपच्या प्रचार यंत्रणेला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुहागर विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गुहागर विधानसभेमध्ये गेले काही वर्ष मोनपाच्या माध्यमातून माजी आ. डॉ. विनय नातू यांचे वर्चस्व होते. मात्र २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचा झेंडा गुहागर विधानसभेमध्ये फडकवला. तेव्हापासून आजतगायत या विधानसभेवरती आ. भास्कर जाधव यांचे वर्चस्व दिसून येते. आगामी विधानसभा २०२४ मध्ये महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? आणि कोण जिंकणार यासाठी मतदारांमध्ये सुद्धा तेवढीच उत्सुकता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाला सुटेल या अनुसंगाने माजी आ. डॉ. विनय नातू यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह विधानसभेमध्ये जोरदार मुसंडी घेत प्रचार यंत्रणा राबवली. गावोगावी जाऊन महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवून भाजपाचा प्रचार सुरू केला. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाचे बॅनर गुहागर विधानसभेमध्ये ठिकाणी लागले आणि विपुल कदम गुहागर विधानसभा लढवणार अशा बातम्या सर्वत्र पसरल्या.

त्यामुळे गुहागर विधानसभेच्या उम`दवाराबाबत सर्वांना एक उत्सुकता लागून राहिली आहे. विपुल कदम यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपाचा प्रचार यंत्रणेचा अश्व रथ थोडासा संथगतीने सुरू आहे. गुहागर विधानसभेमध्ये महायुतीच्या माध्यमातून ही जागा भाजपाला सुटणार की शिवसेना शिंदे गट आपले वर्चस्व सिद्ध करणार किंवा अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाकडे ही जागा जाणार, हा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत नेमका विधानसभेमध्ये कोण उमेदवार असणार याचे सुद्धा कोड उलघडले जाणार नाही. मात्र विद्यमान आ. श्री. जाधव यांच्याशी लढत देताना महायुतीचा तसा तगडा उमेदवार असणं फार गरजेचे आहे. तरच त्या ठिकाणी तुल्यबळ अशी लढत होऊ शकते. नाहीतर एकतर्फी विजय होणार असेच राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

जर भाजपाकडून डॉ. विनय नातूंना उमेदवारी मिळाल्यास त्या ठिकाणी एक रंगतदार लढत होऊ शकते. मात्र या गुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास एकंदरीत काही मतदारांचे असे म्हणणे आहे की, विधानसभेमध्ये महायुतीच्या माध्यमातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तर निश्चितच विद्यमान आमदारांना या ठिकाणी जिंकणं अवघड होऊन बसेल. त्यामुळे महायुतीने जर ओबीसी उमेदवार देण्याचे ठरवले तर जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आता महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेऊन विधानसभेमध्ये ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल, तिथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाची सुरुवात होणार आहे. मात्र सध्या तरी गुहागर विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांचे वर्चस्व असून जर महायुतीचा तगडा उमेदवार मिळाला नाही तर जिथे एकतर्फी लढत होऊ शकते, असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular