28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeMaharashtraसायरस मिस्त्री यांच्यावर दाहसंस्कार, का नाही केले 'टॉवर ऑफ सायलेन्स' मध्ये?

सायरस मिस्त्री यांच्यावर दाहसंस्कार, का नाही केले ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ मध्ये?

पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराचे विधी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांपेक्षा बरेच वेगळे आहेत.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर आज मुंबईतील वरळी स्मशानभूमीत हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिम प्रवास मुंबईतील वाळकेश्वर येथील त्यांच्या सी फेसिंग मॅन्शन येथून वरळी स्मशानभूमीत पोहोचला. वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर दाहसंस्कार झाले. तत्पूर्वी सायरस मिस्त्री यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत गायत्री मंत्र आणि गोविंद गोपाल यांची भजनेही गायली गेली.

आकाश अंबानी, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अनेक कौटुंबिक मित्र सायरस यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराच्या माहितीसह शोकसभेसाठी न येण्याचे आवाहन केले होते.

सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गुजरातमधील उडवाडा येथे बांधलेल्या पारशी मंदिरातून ते परतत होते. लक्झरी मर्सिडीज कार ज्यामध्ये सायरस मिस्त्री सुमारे १३४ किमी प्रतितास वेगाने प्रवास करत होते.

पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराचे विधी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांपेक्षा बरेच वेगळे आहेत. पारंपारिकपणे, पारशी लोक हिंदूंप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह जाळत नाहीत किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचे दफनही करत नाहीत. पारशी लोकांच्या अंतिम संस्काराची परंपरा ३ हजार वर्षे जुनी आहे. पारशी लोकांच्या स्मशानभूमीला दख्मा किंवा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणतात.

‘टॉवर ऑफ सायलेन्स’  गोलाकार पोकळ इमारतीच्या स्वरूपात आहे. सायरस यांचे पार्थिव पारसी लोकांच्या ‘दखमा’ किंवा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ या पारंपारिक स्मशानभूमीत नेण्यात आले नाही. इथे शव विल्हेवाट लावण्यासाठी टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सूर्यप्रकाशात आणि गिधाडांना खाण्यासाठी उघड्यावर सोडले जातात. पण कोरोनाच्या काळात केलेले बदल अजूनही काही पारशी कुटुंबामध्ये अवलंबले जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular