मुंबईतून शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढू लागली असून त्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या घोषित केल्या आहेत. कोकण रेल्वेने दादर-रत्नागिरी या विशेष अनारक्षित गाडीची घोषणा केली आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने सोडलेल्या अतिरिक्त वा विशेष गाड्यांनाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला असून विशेष गाड्यांचीही तिकिटे जवळपास संपत आली आहेत. त्यामुळे होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे.
६ मार्च आणि १३ मार्च – गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० वा. सुटेल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, म ाणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम येथे या गाडीला थांबे असतील. दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
१३ मार्च आणि २० मार्च – गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ठाण पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी येथे थांबे असतील. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
६ मार्च आणि १३ मार्च – गाडी क्रमांक ०११५२ मडगाव सीएसएमटी मड गाव येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल. थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि दादर येथे थांबे असतील. त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता पोहोचेल.
१४ मार्च आणि २१ मार्च – गाडी क्रमांक ०११३० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे येथे थांबे असतील. पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्याही धावणार – विशेष रेल्वेगाड्यांची तिकीटेही संपत असून आता गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी जादा विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू दरम्यान जून महिन्यापर्यंत विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. होळी आणि उन्हाळी हंगामादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.