22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeDapoliकाका-काका हाक मारून माझ्याच पाठीत खंजीरः रामदासभाईंचा टोला

काका-काका हाक मारून माझ्याच पाठीत खंजीरः रामदासभाईंचा टोला

माझ्याकडून पर्यावरण खाते शिकले आणि मलाच बाजुला केलं.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आ. आदित्य ठाकरेंवर जोरदार तोफ डागली आहे. ‘काका-काका म्हणून मला हाक मारली आणि माझ्याच पाठीत खंजिर खुपसत खात्याचा ताबा घेतला’ असा निशाणा त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर साधला आहे. उद्धव ठाकरेंवरही रामदासभाईंनी तोफ डागली आहे. युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे हे ५ ऑक्टोबरला दापोलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मी काडीची किंमत देत नाही, आदित्य ठाकरेंचं योगदान काय ? तो आयत्या बिळात नागोबा, शिवसेना आम्ही मोठी केली’ असं रामदास कदम यांनी म्हटलं ‘आहे.

नेमकं काय म्हणाले कदम ? – आ. आदित्य ठाकरे यांच्या दापोली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मी काडीची किंमत देत नाही, आदित्य ठाकरेचं योगदान काय ? तो आयत्या बिळात नागोबा. शिवसेना आम्ही मोठी केली. हिंमत असेल तर उध्दव आणि आदित्य ठाकरे यांनी इकडे येऊन निवडणूक लढवून दाखवावी, कोकणी जनता गाडून टाकल्या शिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरे बेईमान आहेत, माझ्याकडून पर्यावरण खाते शिकले आणि मलाच बाजुला केलं,’ असा घणाघात कदम यांनी केला आहे.

पाठीत खंजीर खुपसला – पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘काका – काका म्हणून हाक मारत आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ही बाळासाहेबांची शिकवण नाही. आमचं घराणं राजकारणातून बाद करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेशला पाडण्याचे अनेक प्रयत्न केले असा आरोप करतांना दापोलीमधली जनता माझ्यासोबत राहिली’ असे रामदासभाई कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular