28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriपालिकेचे दामले विद्यालय राज्यात भारी...

पालिकेचे दामले विद्यालय राज्यात भारी…

पहिली ते दहावीपर्यंत १ हजार ४७० एवढा पट आहे.

खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पालिकेच्या दामले विद्यालयाने राज्यात सरस कामगिरी केली आहे. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी गुणवत्ता यादी लावावी लागते. या विद्यालयात पहिलीच्या वर्गाची पटसंख्या १८६ आहे. तर पहिली ते दहावीपर्यंत १ हजार ४७० एवढा पट आहे. शहरी भागामध्ये स्पर्धा असतानाच पालिकेच्या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता राखली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही या विद्यालयाचे कौतुक करीत दामले विद्यालयाचा पॅटर्न राज्यात राबविला जाईल, असे सांगितले. रत्नागिरी शहरात पालिकेच्या २२ शाळा होत्या; परंतु पटसंख्या कमी होत गेली आणि आठ शाळा बंद पडल्या. आता १४ शाळा सुरू आहेत. सर्व शाळांची मिळून २२०० एवढी पटसंख्या आहे. पालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन वेगगेवळा आहे.

पैसे भरून अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत शिकविण्याच्या मानसिकतेत आहेत. पालिकेच्या शाळेत मिळणाऱ्या मोफत शिक्षणाकडे मात्र ते पाठ फिरवतात. त्यामुळे पालिकेच्या शाळांची पटसंख्या घटत आहे. परंतु याला दामले विद्यालयाने छेद दिला आहे. पालिकेची पहिली सेमी इंग्लिश शाळा बनण्याचा मान दामले विद्यालयाने पटकाविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शहरातील उच्चभ्रु पालकांचाही कल या शाळेकडे वळत आहे. या शाळेचा दर्जा वाढत असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी नवीन इमारतीसाठी १६ कोटी रूपये मंजुर केले आहेत. सध्या पाहिलीची पटसंख्या १८६ झाली असून अजुनही ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये राज्यात दामले विद्यालय शैक्षणिक दृष्ट्या भारी ठरत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular