33.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली उपनेतेपदाचा राजीनामा, आज ठाण्यात प्रवेश

गेले काही दिवस ज्यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा...

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeKhedखवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला अटक

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला अटक

९.६०० कि.ग्रॅम वजनाची खवले मांजराची खवले आढळून आली.

मुंबई गोवा महामार्गावर भरणे येथील काळकाई देवी मंदीर येथे खवले मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी आलेल्या तस्कराला पकडण्यात आले. विभागीय वन अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. दुपारी २.३० वाजण्याच्या सुन रारास मुंबई गोवा हायवे वरील भरणे येथील काळकाई मंदिराजवळ एक व्यक्ती निळी काळी रंगाची फास्टट्रक बॅग घेऊन संशयितरित्या फिरताना दिसली. या व्यक्तीची कसून तपासणी करण्यात आली. त्याच्याजवळ गोत नायलॉन पिशवीमध्ये ९.६०० कि.ग्रॅम वजनाची खवले मांजराची खवले आढळून आली.

या व्यक्तीला नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अतिष अशोक सोनावणे वय व. ४२ धंदा शेती, रा. तुळशी बुद्रुक बौद्धवाडी ता. खेड जि. रत्नागिरी असे सांगितले. सोबतची खवले कुठून आणली याची विचारणा केली करता श्री. मोरे रा. महाड नामक व्यक्तीने दिनांक २९ रोजी मोबाईल द्वारे संपर्क करून तुळशी खिंडी जवळील गुरांच्या गोठ्यात या. नायलॉन पिशवीमध्ये ठेवलेली वस्तु भरणे येथे जाऊन तेथे दापोलीहन एक व्यक्ती येईल त्याला द्या, असे सांगितले. त्याप्रमाणे श्री. सोनावणे यांनी ती नायलॉन पिशवी खवले मांजराच्या खवल्यासह त्यांचे जवळील फास्ट ट्रक बॅगेत ठेवली.

मंगळवारी सकाळी लोटे येथे हमालीचे काम करून परत येताना भरणे येथील काळकाई देवी मंदिर येथे ‘दापोलीहून येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असतांना त्याला मुद्देमालासह ताब्यात घेणेत आले आहे. पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शकाखाली प्रकाश पाटील, परिक्षेत्र: वन अधिकारी, दापोली, सुरेश उपर वनपाल खेड, अनिल दळवी, वनपाल मंडणगड, साताप्पा सावंत, वनपाल दापोली, गणपत जळणे, वनरक्षक बांधतिवरे, शुभांगी भिलारे, वनरक्षक: ताडील, शुभांगी गुरव, वनरक्षक कोंगळे, प्रियांका कदम, वनरक्षक आंबवली, अशोक ढाकणे, वनरक्षक काडवली या पथकाने पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular