26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeDapoliदापोलीत दहीहंडीच्या बक्षीसावरून राजकीय गटात चढाओढ

दापोलीत दहीहंडीच्या बक्षीसावरून राजकीय गटात चढाओढ

ही दहीहंडी आता कोणते गोविंदा पथक फोडणार यामुळे अनेकांची उत्सुकता ताणून धरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले नेते आमदार योगेश कदम यांचा दापोली हा विधानसभा मतदारसंघ आहे. कदम गटाकडून यंदा कोरोनाच संकट दूर झाल्यामुळे दहीहंडी उत्सवाच  आयोजन करण्यात आलं आहे. असे असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सूर्यकांत दळवी यांनीही कदमांना टक्कर देण्यासाठी दहीहंडी उत्सवात दरवर्षी १ लाख रुपयांचे असलेले बक्षीस यंदा ३ लाख ५१ हजार रुपये इतकं मोठ ठेवलं आहे.

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मध्ये असलेल्या पारंपरिक वादाची ठिणगी वरचेवर पडताना दिसते आहे. दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट व शिवसेनेनं बॅनरबाजीतून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. आमदार योगेश कदम यांनी ३ लाख ३३ हजार ३५१ रुपये तर माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाकडून तब्बल ३ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. ही दहीहंडी आता कोणते गोविंदा पथक फोडणार यामुळे अनेकांची उत्सुकता ताणून धरली आहे.

आमदार योगेश कदम यांनी यापूर्वीही इतक्याच रक्कमेच बक्षीस असलेली दहीहंडी २०१७ सालीही आयोजित केली होती. त्यापुढील वर्षी दापोलीत एका बस अपघातात केकेव्ही मधील ३० जण मृत्युमुखी पडल्याने सगळे उत्सव रद्द करण्यात आले होते. आणि पुढील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षीची दहीहंडी मोठ्या जोशात रंगणार आहे.

सर्वत्र कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात यावर्षी लाखो रुपयांच्या बक्षिसांची चढाओढ पाहायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही दहीहंडी उत्सवात मराठमोळ्या लावणी नृत्याचा कार्यक्रम हे खास आकर्षण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular