23 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeDapoliहर्णे बंदरामध्ये हार्डवेअरच्या दुकानाला आग, जीवितहानी टळली

हर्णे बंदरामध्ये हार्डवेअरच्या दुकानाला आग, जीवितहानी टळली

मळेकर यांच्या बंदरातील हार्डवेअरच्या दुकानाला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

हल्ली शॉकसर्किट मुळे दुकान, घरे, गाळे, हॉटेल यामध्ये आग लागण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. दापोली हर्णे येथील बंदरामध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. बंदराच्या आजूबाजूला दुकाने आणि घरे देखील दाटीवाटीने असल्याने आग सर्वत्र पसरू शकते या भीतीने पाहताक्षणीच आग विझवण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले जात होते. दुकान मालकासह ग्रामस्थांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

काल रात्री हर्णे बंदरामध्ये १२ वाजण्याच्या सुमारास राजवाडी येथील रहिवाशी महेश मळेकर यांच्या बंदरातील हार्डवेअरच्या दुकानाला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी या घटनेमध्ये वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली असून दुकान बंद असल्याने जीवितहानी मात्र टळली आहे.

दुकानाला लागलेली आग ही प्रथमदर्शी शेजारी असणाऱ्या रामचंद्र पावसे याना दिसली त्यांनी लगेच आग लागली म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे लगतचे फत्तेगड, मल्लखांबपेठ, बंदर मोहल्ला, बाजारपेठ येथील सर्व नागरिक मदतीसाठी धावून आले.

पावसे यांनी मळेकर याना देखील फोन करून त्यांच्या दुकानाला आग लागल्याचे कळवले. तातडीने राजवाडीतील सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. लगेचच सर्व मच्छीसेंटरचे चालक मालक यांनी घटनास्थळी धाव घेतली. हळूहळू वाऱ्यासारखी बातमी हर्णे पाजपंढरी परिसरात पसरली. तातडीने गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. दीड वाजेपर्यंत किमान ८०% आग आटोक्यात आली. परंतु, या लागलेल्या अवधीमध्ये दुकानाच्या आतील अधिकतम समान जाळून गेले. तर काही अर्धवट जळले.

RELATED ARTICLES

Most Popular