24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeDapoliदापोली कळंबट शाखा पोस्ट कार्यालयात लाखोंचा अपहार

दापोली कळंबट शाखा पोस्ट कार्यालयात लाखोंचा अपहार

जोगळेकर यांचे शिक्षण कमी असल्याने व त्यांना हे डिजिटल व्यवहार करण्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या.

अद्ययावत यंत्रणेची माहिती नसल्याने अनेकदा आर्थिक स्वरूपाचे नुकसान घडण्याची शक्यता असते. सध्या सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने काही शासकीय यंत्रणा देखील पाठी नाहीत. परंतु, ऑनलाईन पद्धतीमध्ये फसगत होण्याचे प्रकार देखील घडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

दापोली तालुक्यातील कळंबट येथील शाखा पोस्ट कार्यालयात शैलेश वसंत जोगळेकर हे १६ ऑगस्ट १९९३ पासून शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होते. सर्व पोस्ट कार्यालयात आयबीपीचे व्यवहार डिजिटल स्वरूपात होत असून शाखा डाकपाल यांना आयबीपी मोबाईल हँडसेट, युजर आयडी व पासवर्ड देण्यात येतो. तो कोणालाही देण्याची परवानगी नसते.

जोगळेकर यांचे शिक्षण कमी असल्याने व त्यांना हे डिजिटल व्यवहार करण्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या. म्हणून त्यांनी त्यांच्या एका विश्वासू नातेवाईकाला हे डिजिटल व्यवहार करण्यास सांगून त्याला युजर आयडी व पासवर्ड दिला होता. या नातेवाईकाने २९ जुलै २०२० ते २१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये स्वतःच्या व अन्य एका व्यक्तीच्या खात्यात आयबीपीची रक्कम भरली;  परंतु, त्यांची नोंद मात्र पोस्ट कार्यालयातील हिशोबामध्ये केली नाही.

दापोली तालुक्यातील कळंबट येथील शाखा पोस्ट कार्यालयात १ लाख ५६ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी शाखा डाकपालाविरोधात दापोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अपहाराची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याने पोस्टखात्याच्या नियमानुसार, शैलेश जोगळेकर यांच्या विरोधात दापोलीचे डाकघर निरीक्षक ज्ञानेश्वर बोंगाणे यांनी दापोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही बाब तपासणीत उघड झाल्यावर शैलेश जोगळेकर यांनी १ लाख ५६ हजार रुपयांचा भरणा २६ ऑगस्ट २०२० ला टपाल कार्यालयात केला व ही घटना त्यांनी डाकघर निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या लेखी जबाबात मान्य देखील केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular