24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliमेडिकल स्टोअर मालकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या

मेडिकल स्टोअर मालकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या

व्यवसायिकाने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दापोली शहरातील समर्थ मेडिकल स्टोअर्सचे मालक महेश शिवाजी भांबुरे वय ४४ यांनी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. व्यवसायिकाने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. काल सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला असून, गावामध्ये या प्रकाराने सर्व भांबावून गेले आहेत.

काल सकाळी महेश भांबुरे घरातून बाहेर पडले. तेव्हापासून त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. याचवेळी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळले. त्यांचा चुलत भाऊ डॉ. विलास शंकर भांबुरे यांनी या सगळ्या घटनेची माहिती दापोली पोलिसांना दिली.

महेश भांबुरे यांनी दापोली बाजारपेठेतील त्यांच्या समर्थ मेडिकल स्टोअर्सच्या दुकानात येऊन झाडांवर मारण्याचे कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर ते गिम्हवणे येथील गजानन महाराज मंदिरात गेले. तिकडे ते मागील बाजूस बसलेले आढळल्याने तेथील संबंधित व्यवस्थापकाने तात्काळ मंदिराच्या संबंधित संचालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळच राहणारे देवस्थान पदाधिकारी देवळात दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून तात्काळ ऍम्ब्युलन्स बोलवली व त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले पण दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मयत महेश भांबुरे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. ते अनेकांना मदत करायचे. उदयनगर परिसरात भाऊ जालिंदर भांबुरे व कुटुंब असे एकत्रित स्वरूपात राहत होते. त्याच्या जाण्याने दापोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भांबुरे कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. महेश यांच्या पश्चात्य आई, पत्नी, लहान मुलगी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. भांबुरे कुटुंब मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील पेठ इस्लामपूर परिसरातील असून त्यांच्या गेल्या दोन ते तीन पिढ्या अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त दापोलीत स्थायिक आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular