25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeMaharashtra१८ जिल्ह्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं

१८ जिल्ह्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं

निवडणूक आयोगाने राज्यातील १ हजार १६६  ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

राज्य सरकारने सरपंच निवडीबाबत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला होता. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२  रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

महाराष्ट्रात सध्या विविध विषयांवरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबईत दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट, भाजप आणि मुख्य शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. हा संघर्ष पुढचे काही दिवस असाच चालू राहण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या महिन्यात आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. हजारो गावांमध्ये राजकीय रणधुमाळी बघायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या आगामी काळात प्रत्येक पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १८ जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १ हजार १६६  ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या १ हजार १६६ ग्रामपंतायतींसाठी १३  ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. मतदान १३ ऑक्टोबर २०२२  रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७  सप्टेंबर २०२२  या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४  व २५  सप्टेंबर २०२२  रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८  सप्टेंबर २०२२  होईल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular