26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeDapoliदापोलीतील देर्दे शाळेतील प्राथमिक शिक्षक ते पोलीस निरीक्षक प्रवास

दापोलीतील देर्दे शाळेतील प्राथमिक शिक्षक ते पोलीस निरीक्षक प्रवास

जिल्हा परिषदेच्या देर्दे मराठी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले केदार रावसाहेब उमाटे हे पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत.

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या देर्दे मराठी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले केदार रावसाहेब उमाटे हे पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड गावचे रहिवासी असलेले पण प्राथमिक शिक्षक म्हणून दापोलीतील देर्दे शाळेत नोकरी करीत असलेले उमाटे यांनी जिद्द आणि चिकाटीने यशाला गवसणी घातली आहे. कोरोनामध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्या परिस्थितीतून सावरून केदार उमाटे या युवा शिक्षकाने स्वत:सह कुटुंबाला सावरत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले.

दापोलीतील देर्दे शाळेत प्राथमिक शिक्षक  ते पोलीस उपनिरीक्षक प्रवासाबद्दल त्यांनी माहिती सांगितली.  शिक्षक म्हणून नोकरी करत त्यांनी हि परीक्षा देऊन यश संपादन केले. पण शिक्षकाची नोकरी मिळाल्यावरही जिद्द न सोडता, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन अभ्यासात सातत्य राखत केदार उमाटे यांनी शेवटी यशाला गवसणी घातली. २०१७ साली त्यांनी प्रथम परीक्षा दिली होती, परंतु त्यामध्ये यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१९ मध्ये राय्त्न केला. मार्च २०१९ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात झाली फेब्रुवारी २०२२ मध्ये शरीरिक चाचणी व इंटरव्ह्यू घेण्यात आला. याचा निकाल ८ मार्च लागला असून ही यशस्वी विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून १८३ व्या क्रमांकावर केदार यांचे नाव झळकले आहे.

याबद्दल अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ दापोलीच्या वतीने शिक्षक नेते रमाकांत शिगवण,प्रविण काटकर आदि मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करुन केदार उमाटे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आपले यश वडिलांना समर्पित करीत असल्याचे सांगत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular