25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeEntertainmentठरलं... १७ एप्रिलला आलिया भट होणार, मिसेस कपूर

ठरलं… १७ एप्रिलला आलिया भट होणार, मिसेस कपूर

या क्युट कपलच्या ग्रॅण्ड वेडिंगला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे

रणबीर आणि आलिया ४ वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत असतो.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या तारखेची चर्चा अनेक दिवस सुरु आहे. अखेर ती तारीख ठरली आहे. मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार, १३ एप्रिलपासून या कपलचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. चेंबूरच्या ‘आरके हाऊस’मध्ये लग्नाआधीच्या विधी आणि भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. ३-४ दिवसांच्या विधी आणि सोहळ्यनंतर १७ एप्रिलला रणबीर-आलिया पंजाबी पारंपारिक रिती रिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरके हाऊसमध्ये दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेबाबत दोघांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कुटुंबीयांना दोघांच्या लग्नाचा गाजावाजा करायचा नाहीये. १३ एप्रिल रोजी या आलियाच्या हातावर मेहंदी लावली जाणार आहे. यानंतर हळद, संगीतासह सर्व सोहळे होतील. रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह देखील आरके हाऊसमध्येच संपन्न झाला होता. हे कपूर घराण्याच्या या पिढीतील शेवटचे लग्न असण्याची शक्यता आहे म्हणून ते याच भव्य बंगल्यात एक प्रशस्त लॉन आहे तिथे हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

या क्युट कपलच्या ग्रॅण्ड वेडिंगला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणबीर कपूरने त्याच्या लग्नात टेक्निशियन, हेअर आणि मेकअप आर्टिस्ट, स्पॉट बॉय आणि त्याच्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सर्व असिस्टंटनाही आमंत्रित केले आहे. या लग्नात ४५० हून अधिक पाहुणे सहभागी होणार असल्याचे समजले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular