24.4 C
Ratnagiri
Tuesday, January 27, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeDapoliदापोली गारठली पारा ९.४ अंशांवर

दापोली गारठली पारा ९.४ अंशांवर

पारा घसरला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आपल्याकडील पारा घसरत आहे.

दापोली शहर परिसर अर्थात ‘मिनी महाबळेश्वर’ येथे कडाक्याची थंडी पडली आहे. आज (ता. १६) तापमानाची सर्वात कमी म्हणजेच ९.४ अंश सेल्सिअस नोंद झाली. भारतीय हवामान खात्यातर्फे देशात सलग तीन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा प्रत्यय दापोलीमध्ये येत आहे. यापूर्वी १९९९ मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची (३.४ अंश सेल्सिअस) नोंदही दापोलीत झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर मंगळवारी (ता. १६) ही नोंद झाली आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी ८ पासून मंगळवारी (ता.१६) सकाळी ८ वा. पर्यंत झालेल्या चोवीस तासांतील ही नोंद आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान १५ अंशांवर आले होते.

बऱ्यापैकी सुरू झालेल्या थंडीमुळे उत्साही पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. गेल्या शनिवार रविवारी पर्यटकांनी मुरुड, पाळंदे आंजर्ले बीचवर गर्दी केली होती. दापोली शहर समुद्र सपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. एवढ्या उंचीवर असले तरी अवघ्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा आहे. सध्या किनाऱ्यावरदेखील गेले दोन दिवसांपासून थंड वारे वाहत होते. त्यामुळे किनारपट्टीलादेखील थंड हवामान होते. कोकण किनारपट्टी भागात डिसेंबरमध्ये हुलकावणी दिलेल्या थंडीने जानेवारीत मुक्काम करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये १३ जानेवारी २०२३ रोजी नीचांकी ९.२ अंश इतके तापमान नोंदले गेले होते.

थंडीचा हंगाम सुरू होताच पक्ष्यांची गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किनाऱ्यावर सकाळ, संध्याकाळ सिगल पक्ष्यांचा मुक्काम असतो. थंडीच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल परिसर यामुळे हे पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात. पारा घसरल्याने या पक्ष्यांचा मुक्काम अजूनही वाढण्याची शक्यता आहे. पारा घसरला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आपल्याकडील पारा घसरत आहे. आजचा पारा हा सूर्योदयापूर्वीच घसरला आहे. त्यामुळेच थंडीच प्रमाण वाढलं आहे, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. विजय मोरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular