29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeSindhudurgराणे यांच्या विजयाचे सारथ्यच मीच करणार – दत्ता सामंत

राणे यांच्या विजयाचे सारथ्यच मीच करणार – दत्ता सामंत

आगामी काळात राणे आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच काम करणार.

२०२४ ला मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणेच असतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी घुमडे ता. मालवण येथे व्यक्त केला. श्री. सामंत म्हणाले, ‘‘नीलेश राणे हे पितृप्रेम असणारे भावनिक नेतृत्व आहे. त्यांच्यासारखा दानशूर आणि दिलदार व्यक्ती जिल्ह्याच्या राजकारणात नाही. हे वास्तव जनतेपर्यंत पोहचवू. आगामी काळात राणे आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच काम करणार. काही महिन्यांपूर्वी नीलेश राणे माझ्या घरी आले. मलाच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी विचारले. अशा दिलदार स्वभावाचे हे नेतृत्व आहे.

माझे आणि नीलेश राणे यांचे शत्रुत्व आहे, असे चित्र निर्माण केले जाते. अशा अफवा उठवल्या जातात. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राणे यांच्या विजयाचे सारथ्यच मीच करणार हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘मधल्या काळात मी शिवसेनेत प्रवेश करणार, अशा देखील अफवा उठवल्या गेल्या. मात्र, खरी वस्तुस्थिती खासदार विनायक राऊत यांचे पीए नागेंद्र परब व अन्य काही मंडळी माझ्या घरी आले. राणेंच्या विरोधात वक्तव्य केली. माझ्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मी त्यांना तिथून जाण्यासाठी सांगितले. मी दुसऱ्या पक्षात जाणार याच्या वावडया उठवण्यात आल्या. मात्र, सत्य बराच काळ लपत नाही. मी राणेंसोबत होतो आणि यापुढेही राणेंसोबतच असणार.

माझ्यासाठी जीवनात राणे कुटुंबीय कायमच सर्वोच्च पदी राहणार असून, त्यांच्या प्रचारार्थ आगामी काळात मालवण कुडाळ तालुक्यात मी विभागवार दौरे करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular