23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeKhedमहामार्गावर वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू

महामार्गावर वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू

रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहने सावकाश चालवावे असे अहवान वनविभागामार्फत केले गेले आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील आवाशीनजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नर जातीच्या सांबराचा मृत्यू झाला. महामार्गावर वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास आल्याने सचिन खोपकर यांनी सकाळी ७.०० वा स्थानिक वन अधिकारी यांना दुरध्वनीव्दारे कळविले. वनविभागाला ही बातमी प्राप्त होताच ७.३० चे दरम्यान घटनास्थळी वनक्षेत्रपाल दापोली श्री. पी. जी. पाटील व त्याचे अधिनस्त कर्मचारी यांनी पाहणी केली. सांबर मृत अवस्थेत दिसून आला. मृत्यू पावलेला सांबर हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ७ ते ८ वर्ष असावे, वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सदर सांबर मृत झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

त्याच्या तोंडाला मार लागून रक्त येत होते. तर पाठीमागील उजव्या पायांवरती खरचटलेल्या खुणा दिसुन आल्या. मृत सांबर ताब्यात घेवुन पशुवैद्यकिय अधिकारी खेड यांजकडून तपासणी करण्यात आली. सदरील घटना ही सकाळी ४ ते ५ वा. च्या सुमारास घडली असावी असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या घटनेबाबत वनक्षेपाल दापोली यांनी अज्ञात वाहन व वाहनचालकाविरूध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे. तपास विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई (अतिरिक्त कार्यभार), व वैभव बोराटे, (सहाय्यक वनसंरक्षक) (अ. का.), रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली व पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, पुढील तपास करीत आहेत.

वनपाल खेड सुरेश उपरे, वनरक्षक काडवली अशोक ढाकणे, वनरक्षक आंबवली श्रीम. प्रियांका कदम, वनरक्षक तळे परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक खवटी रानबा बंबर्गेकर उपस्थित होते. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल दापोली यांनी केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहने सावकाश चालवावे असे अहवान वनविभागामार्फत केले गेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular