अवघ्या आठ- दहा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षापासून ‘लालबागचा राजा’ गणेशमूर्तीला अधिक पसंती मिळत आहे. त्याच जोडीला कोळीबांधवांच्या वेशभूषेतील बाप्पा या गणेशमूर्तीनांही यंदा गणेशभक्तांकडून विशेष पसंती आहे. अयोध्याभूमी, श्रीराम-सीता, भारतमाता यांची छबी असलेल्या मूर्तीना अधिक मागणी आहे. श्रींच्या स्वागताची घरोघरी लगबग सुरू झाली आहे. साऱ्यांच्या घरचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आकर्षक रंगसंगती आणि विविध आकारातील मूर्तीना गणेशभक्तांकडून अधिक पसंती असते. गेल्या काही वर्षापासून लालगबागच्या राजाला भक्तांकडून अधिक पसंती आहे.
यावर्षी ती कायम राहताना अन्य पोझिशनमधील गणेशमूर्तीना भक्तांकडून पसंती दिसत आहे. त्यांच्या मागणी आणि पसंतीनुसार मूर्तिकारांनीही विविधांगी पोझिशन आणि चित्रांच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यामध्ये सव्वा फूटपासून चार-साडेचार-पाच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीचा समावेश आहे, गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या शाडूच्या मातीसह कारागारांची मजुरी, वाहतूकखर्च आदींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. रंगांचे दर वाढल्यामुळे यंदा महागाईचा सामना करावा लागत आहे.
गणेशमूर्तीचे अंदाजे दर – सव्वा फूट मूर्ती : १४०० रु. दीड फूट मूती : १८०० रु. दोन फूट मूर्ती : २५०० रु. अडीच फूट मूर्ती : ३५०० रु. तीन फूट मूर्ती : ५ हजार रु. साडेतीन फूट मूर्ती : ७५०० रु.