24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriदादर - रत्नागिरी पॅसेंजर नियमित करण्याची मागणी

दादर – रत्नागिरी पॅसेंजर नियमित करण्याची मागणी

रत्नागिरी - दिवा पॅसेंजरचा प्रवासही त्रासदायकच आहे.

रत्नागिरी दादर पॅसेंजरची दिवा पॅसेंजर केल्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगर, घाटकोपर, भांडुप, वसई, विरार, ठाणे परिसरातील कोकणीबांधवांना प्रवास करतांना अनेक अडचणी येत आहेत. प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन जल फाऊंडेशनने दिवा- रत्नागिरी गणपती विशेष मेमू ही (०११५३/ ०११५४) दादर रत्नागिरी मार्गावर ठाणे, दिवा, पनवेल, पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देऊन नियमित करण्याची मागणी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली होती.

जवळपास वीस वर्षे सुरू असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजरची दिवा पॅसेंजर केल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत भर पडत आहे. पश्चिम उपनगर, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील कोकणी बांधवांना प्रवास करताना अनंत अडचणी येत आहेत. कित्येकांनी त्या गाडीने प्रवास करणेच सोडून दिले आहे. कोकण मार्गावरील काही स्थानकांवर केवळ सावंतवाडी- दिवा व रत्नागिरी-दिवा या दोनच गाड्या थांबतात.

परंतु दिवा- सावंतवाडी ट्रेन पकडण्यासाठी उत्तर मुंबईतील व पालघर विभागातील पश्चिम रेल्वे प्रवाशांना पहाटे ३ वाजता घर सोडावे लागते. तर सावंतवाडी दिवाने आल्यावर घरी पोहोचायला रात्री ११ ते १२ वाजतात. त्याचप्रमाणे रत्नागिरी – दिवा पॅसेंजरचा प्रवासही त्रासदायकच आहे. त्यामुळे अनेकांनी रेल्वेचा पर्याय निवडणे बंद केला आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन जल फाऊंडेशनने दिवा – रत्नागिरी गणपती विशेष मेमू दादर ते रत्नागिरी मार्गावर ठाणे, दिवा, पनवेल, पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देऊन नियमित करण्याची मागणी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular