26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriरत्नागिरीत हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश

रत्नागिरीत हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश

तब्बल ५७ मोबाईल पुनर्प्राप्त करण्यात आले. नुकताच छोटेखानी कार्यक्रम घेऊन मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.

जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत हरवलेले मोबाईल शोधण्यास रत्नागिरी पोलिसांना यश आले असून ५७ मोबाईल हस्तगत करून ४० मोबाईलचे वाटप पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात मोबाईल हरवल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. नजरचुकीने अनेकांचे मोबाईल गहाळ झाल्याने अशा मोबाईलधारकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल ५७ मोबाईल पुनर्प्राप्त करण्यात आले. नुकताच छोटेखानी कार्यक्रम घेऊन मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याहस्ते ४० मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. उर्वरित १७ मोबाईल सायबर पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गहाळ मोबाईल परत मिळवून देण्यात म लाची कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक मुख्यालय निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पोलीस निरीक्षक श्रीमती. शैलजा बोबडे, राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती. वैशाली आडकूर व पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री न गायकवाड यांनी सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये. याकरिता मोबाईल वापरताना जनतेने घ्यावयाची 7 दक्षता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले म गहाळ मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल उपस्थित ४० मोबाईल मालकांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोना/४४४ रमिज शेख, पोशि/३२७ निलेश शेलार व पोशि/ ९८८ अजिंक्य ढमढेरे आदींनी तपासकामात विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

Most Popular